आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापालिका निवडणुकीची प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाली आहे. या रचनेवर हरकती घेण्यासाठी १४ मे ही शेवटची मुदत होती. त्यात शुक्रवारी १३ मेपर्यंत पालिकेकडे १२ हरकती प्राप्त झाल्या होत्या. शनिवारी शेवटच्या ६७ हरकती प्राप्त झाल्याने एकूण संख्या ७९ झाली.
राज्य शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील प्रभाग रचना मार्च महिन्यात सुरु केली होती. यानंतर राज्य शासनाने प्रभाग रचना व निवडणूक कार्यक्रम स्वत:कडे घेण्याचा कायदा केला. यानंतर मार्च मधील प्रभाग रचनेवरील हरकतीच्या कार्यक्रमावर स्थगिती आली होती. मध्यंतरी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार निवडणूक आयोगाने मार्चमधील प्रभाग रचना कायम ठेवत पुन्हा हरकतीचा कार्यक्रम सुरू केला. यानुसार १४ मे पर्यंत हरकती घेण्यास मुदत होती. त्यात शुक्रवारपर्यंत १२ हरकती प्राप्त झाल्या होत्या. शनिवारी अखेरच्या दिवशी तब्बल ६७ हरकती आल्या. यामुळे हरकतींची एकूण संख्या ७९ झाली. या सर्व हरकतींवर जिल्हाधिकाऱ्यांकडे सुनावणी होईल. यानंतर ६ जूनपर्यंत राज्य निवडणूक आयोग अंतिम प्रभाग रचनेला मंजुरी देईल.
शिवसेनेची संपूर्ण रचनेवर हरकत
पालिकेने प्रारूप प्रभाग रचना करताना प्रभाग नकाशा परिशिष्ट अ नुसार तयार करावा, अशा सूचना दिल्या आहेत. त्यात गुगल अर्थ च्या नकाशावर प्रगणक गटांच्या सीमा हिरव्या रंगाने दर्शवणे, प्रगणक गटांचे क्रमांक व त्या प्रगणक गटांची लोकसंख्या दर्शवावी असा उल्लेख आहे. मात्र, प्रगणक गटांचे क्रमांक व त्या प्रगणक गटांची लोकसंख्या प्रारूप प्रभाग रचनेच्या नकाशावर दर्शवलेली नाही. यामुळे शिवसेनेने संपूर्ण प्रारूप रचनेवर हरकत नोंदवली. उपजिल्हाप्रमुख प्रा. उत्तम सुरवाडे, तालुका संघटक प्रा.धीरज पाटील, शहरप्रमुख नीलेश महाजन, माजी नगरसेवक मुकेश गुंजाळ, कैलास लोखंडे यांनी ही हरकत नोंदवली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.