आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामार्गशीर्ष महिन्यातील सफला एकादशीला आदिशक्ती संत मुक्ताई दर्शनाचे विशेष महात्म्य असते. या पार्श्वभूमीवर १९ डिसेंबर रोजी सफला एकादशीचे औचित्य साधून खान्देश, विदर्भ व मराठवाड्यातील वारकरी, भाविकांनी पहाटेपासूनच कोथळी व मुक्ताईनगरात दर्शनासाठी गर्दी केली.
वारकऱ्यांची संभाव्य गर्दी लक्षात घेऊन मुक्ताईनगर पोलिसांनी बंदोबस्त ठेवला. २० डिसेंबरला सद्गुरू झेंडूजी महाराज बेळीकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त कोथळी येथील गादीसेवक भरत महाराज पाटील यांचे कीर्तन सकाळी ८ ते १० वाजेदरम्यान होईल.
११ क्विंटल साबुदाणा खिचडीचे भाविकांना वाटप या मंदिरात मनुर बुद्रुक येथील प्रमोद दिनकर पाटील यांच्या हस्ते संत मुक्ताई यांच्या मूर्तीचा अभिषेक व महापूजा करण्यात आली. पळसी सुपो वारकरी मंडळी व संतोष भिसे, गजानन कासार, गजानन वाघ (बोदवड), गंभीर चौधरी (विटवे), रमेश चौधरी (बेलसवाडी) यांनी आलेल्या भाविकांना ११ क्विंटल साबुदाणा खिचडीच्या फराळाचे वाटप केले. दिवसभरात शिरीष महाराज (वाघाडी), समाधान महाराज गावंडे यांची कीर्तने झाली. वाघाडी ग्रामस्थांकडून एकादशी जागर व द्वादशी पारणे सेवा रूजू होईल. पातोंडा, धामोडी, फैजपूर, धामणगाव बढे, जामनेर येथून काही दिंड्या देखील कोथळी येथे दाखल झालेल्या होत्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.