आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नसोहळ्यासाठी आलेल्या वऱ्हाडींवर घाला‎:नागेश्वर मंदिराकडे जाताना एसटीची‎ धडक, दुचाकीवरील मनूरचे तीन ठार‎

वरणगाव‎9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाऊबंदकीमधील विवाहासाठी‎ पिंपळगाव बुद्रूक (ता.भुसावळ)‎ आल्यानंतर वरणगावजवळील‎ नागेश्वर महादेव मंदिरावर‎ दर्शनासाठी जाणाऱ्या तिघांच्या‎ दुचाकीला समोरून येणाऱ्या एसटीने‎ धडक दिली. या अपघातात मनूर‎ बुद्रुक (ता.बोदवड) येथील‎ तिघांचा मृत्यू झाला. सोमवारी दुपारी‎ २ वाजता वरणगाव जवळील सुसरी‎ शिवारात ही दुर्घटना घडली.‎ मनुर बुद्रूक येथील रहिवासी राहुल‎ मुरलीधर शेळके यांचा सोमवारी‎ वरणगाव जवळील पिंपळगाव येथे‎ विवाह होता. यासाठी वऱ्हाडी‎ जमले होते. त्यात शेळके यांच्या‎ मनुर बुद्रूक येथील तीन तरुणही‎ लग्नासाठी आले होते.

बातम्या आणखी आहेत...