आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करास्वच्छ सर्वेक्षण २०२३’ आणि ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत सोमवारी ‘नाे व्हेइकल डे’ पाळावा असे आवाहन पालिकेने केले होते. या आवाहनाला शहरात किती प्रतिसाद मिळाला? याची ‘दिव्य मराठी’ने सोमवारी (दि.१९) पाहणी केली. त्यात पालिकेतील २४० कर्मचारीच नव्हे तर शहरातील प्रांत, तहसील कार्यालय, सार्वजनिक बांधकाम, आरोग्य, पाेलिस प्रशासन, पंचायत समिती या सर्वच कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी या आवाहनास केराची टोपली दाखवली. परिणामी ‘नाे व्हेइकल डे’चा फज्जा उडून सर्वांनी दुचाकी, कारचा वापर करून आपापली कार्यालये गाठल्याचे दिसले.
केंद्र शासनातर्फे स्वच्छ सर्वेक्षण २०२३ व महाराष्ट्र शासनाकडून माझी वसुंधरा अभियान ३.० हे राज्यव्यापी अभियान सुरू आहे. या अभियानात भुसावळ शहराचा सक्रिय सहभाग आहे. ते कृतीतून दाखवून देण्यासाठी पालिकेमार्फत पर्यावरण पूरक उपक्रम, स्वच्छ व सुंदर शहर विकसित करून प्रदूषणमुक्त हवेच्या उपलब्धतेसाठी हरित शहर ही संकल्पना राबवण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून सोमवारी नाे व्हेइकल डे पाळावा असे आवाहन पालिकेने केले हाेते. पण, खुद्द पालिकेसह कोणत्याही शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी सायकलचा वापर करून कार्यालय गाठले नाही. सर्व कार्यालयांचे प्रमुख अधिकारी चारचाकी वाहने, कर्मचारी दुचाकीने कार्यालयातून आल्याचे दिसले. शासकीय कामानिमित्त विविध ठिकाणी पाहणी करताना देखील वाहनांचा वापर झाला.
पंचायती समिती एकाही कर्मचाऱ्याने पालिकेला प्रतिसाद दिला नाही. अधिकारी, कर्मचाऱ्यांनी देखील वाहनांचा वापर केला. पंचायती समितीच्या आवारात अनेक दुचाकी उभ्या केलेल्या होत्या.
तहसील कार्यालय अधिकारी शासकीय वाहनाने आले हाेते. अन्य कर्मचाऱ्यांनी वाहनांचा वापर केला. तहसील कार्यालयात सुमारे २५ कर्मचारी कर्तव्यावर असतात. मात्र कुणीही नाे व्हेइकल डे पाळला नाही.
प्रांत कार्यालय प्रांताधिकारी तथा पालिकेचे प्रशासकीय अधिकारी बाहेरगावी गेले होते. पण, कार्यालयातील कर्मचारी वाहनांनी कार्यालयात आले व सायंकाळी परत गेले. या कार्यालयात १० कर्मचारी आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.