आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोकसहभाग:चंपावती नदीसाठी जमवले दीड लाख ; चहार्डीत दिवसांपासून नदीपात्र स्वच्छतेचे सुरू आहे काम

चोपडा10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील चहार्डी गावाच्या मध्यभागातून वाहणाऱ्या चंपावती नदीपात्राची लोकवर्गणीतून स्वच्छता केली जात आहे. या कामासाठी ग्रामस्थांनी दीड लाख रुपये लोकवर्गणी जमा केली आहे. चाळीसगावातील सेवा सहयोग फाउंडेशन व भूजल अभियानाच्या मदतीने गुणवंत सोनवणेंच्या माध्यमातून हे काम होत आहे.

नदीपात्राच्या साफसफाईवर गुणवंत सोनवणे यांनी जेसीबी मशीन उपलब्ध करून दिले. तसेच सर्व शेतकऱ्यांनी मिळून जेसीबीसाठी डिझेल उपलब्ध केले. त्या माध्यमातून गेल्या १५ दिवसांपासून हे काम सुरू आहे. अनेक वर्षांनंतर या नदीपात्राची स्वच्छता आणि खोलीकरण झाल्याने, पाण्याचा प्रवाह मोकळा झाला आहे. उदय पाटील यांच्याहस्ते पोकलेनची पूजा करून कामाचा शुभारंभ केला. या प्रसंगी महेंद्र चौधरी, चहार्डी सरपंच चंद्रकलाबाई पाटील, उपसरपंच तुळशीराम कोळी, पवन कोळी, मनोज भामरे, रोहीत पाटील यांनी मेहनत घेतली. नदीपात्राच्या स्वच्छतेमुळे परिसरातील झाडेझुडपे हटवली गेली. त्यामुळे पाण्याच्या प्रवाहातील अडथळे आता दूर झाले आहेत.

नदीपात्र स्वच्छतेसाठी यांनी दिले योगदान

चहार्डी येथील कामासाठी जिल्हा बँकेचे संचालक घनश्याम अग्रवाल यांनी २१ हजार, जिल्हा बँकेचे माजी संचालक डॉ .सुरेश पाटील यांनी २० हजार, रामकृष्ण पाटील यांनी पाच हजार, वनिता महिला सहकारी पतसंस्थेमार्फत १८ हजार, मुख्याध्यापक व्ही.आर. सोनवणे यांनी पाच हजार, गावातील १० ग्रामपंचायत सदस्यांनी २६ हजार ५०० रुपये एकत्रित मदत दिली आहे. तसेच गावातील झाडन चौकातून १२ हजार व गावातील काही ग्रामस्थांनी आपल्या परीने ५०० ते एक हजार रुपयांची मदत दिली.

बातम्या आणखी आहेत...