आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हवामान:ढगाळ वातावरणाने तापमानात एक अंश घट; पण किमान तापमान 36.5

भुसावळ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात ५ मे पासून सलग उच्चांकी तापमान कायम आहे. सोमवार व मंगळवारी दोन दिवस शहराचे तापमान ४७.२ अंश होते. बुधवारी दुपारपासून ढगाळ वातावरण असल्याने तापमानात एक अंशांची घसरण होऊन ते ४६.३ अंशांवर आले. उन्हाच्या झळा नसल्या तरी उष्णतेची धग मात्र कायम होती.

यंदाच्या उन्हाळ्यात सोमवार आणि मंगळवार सलग दोन दिवस ४७.२ अंश तापमान होते. बुधवारी दुपारी ढगाळ वातावरणामुळे काही अंशी उष्ण झळांपासून दिलासा मिळाला. तरीही केंद्रीय जल आयोगाच्या कार्यालयात शहराचे तापमान ४६.३ अंश असल्याची नोंद झाली. दोन दिवसांच्या तुलनेत तापमान ०.९ अंशाने घटले. शहरात शुक्रवारपर्यंत (दि.१३) तापमान चढे राहील. यानंतर त्यात घट होईल असा अंदाज आहे. दरम्यान, शहराच्या कमाल तापमानासोबत आता रात्रीचे किमान तापमान वाढते आहे. मंगळवारी रात्री किमान तापमान ३६.५ अंश होते. म्हणजेच कमाल व किमान तापमानात केवळ दहा अंशांची तफावत होती.

बातम्या आणखी आहेत...