आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुचाकींची रॅली:ठाकरेंच्या स्वागतासाठी एक हजार दुचाकींची रॅली

पाचोरा4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेनेच्या युवासेनेचे नेते आदित्य ठाकरे शनिवारी (दि.२०) रोजी दुपारी १२ वाजता पाचोऱ्यात येत आहेत. हुतात्मा स्मारकास भेट दिल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवतीर्थ या शिवसेना कार्यालयाजवळ संवाद साधणार आहेत. त्यासाठी जाेरदार तयारी सुरु आहे. स्वागतासाठी एक हजार दुचाकींची रॅली काढण्यात येणार असल्याची माहिती माजी आमदार स्व.आर.अो. तात्या यांच्या कन्या वैशाली सूर्यवंशी यांनी गुरुवारी पाचोऱ्यात आयोजित पत्रपरिषदेत दिली. यावेळी उपजिल्हाप्रमुख अॅड. अभय पाटील, शेतकरी सेनेचे जिल्हाप्रमुख अरुण पाटील, तालुका प्रमुख शरद पाटील, माजी जि. प. सदस्य उद्धव मराठे, राजेंद्र साळुंखे, शेतकरी सेनेचे तालुकाप्रमुख रमेश बाफन, नाना वाघ उपस्थित होते.

आदित्य ठाकरे यांचे २० रोजी सकाळी ११ वाजता जळगाव येथे आगमन होईल. सामनेर, लासगाव, नांद्रा, हडसन, खेडगाव (नंदीचे), बिल्दी, गोराडखेडा येथील स्थानिक शिवसैनिक त्यांचे स्वागत करतील व मोठ्या संख्येने महिला औक्षण करणार आहेत. सामनेर येथून ५०० दुचाकींची रॅली वरखेडी नाक्यापर्यंत येईल. तेथून तालुका व शहरातून पुन्हा ५०० दुचाकी रॅलीत सहभागी होतील. भडगाव रोडवरील महाराणा प्रताप चौकात आल्यानंतर महाराणा प्रताप महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन होईल. छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करुन शिवतिर्थनजीक पोहोचणार आहेत. पाचोरा मतदार संघातील शिवसैनिक व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिव संवाद यात्रेत सहभागी व्हावे असे आवाहन वैशाली सूर्यवंशी यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...