आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दरात पुन्हा वाढीचे संकेत:आठवड्यात 5 रुपयांनी महागला कांदा; परतीच्या पावसाचा उत्पादनाला फटका

भुसावळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

यंदा परतीच्या पावसामुळे कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामुळे नोव्हेंबरमध्ये बाजारात होणारी नवीन कांद्याची आवक कमी होईल. परिणामी गेल्या आठवड्यात २० रुपये किलोवर घसरलेला कांदा आता २५ रुपये किलोपर्यंत पोहोचला आहे. आगामी काळात कांद्याच्या दरात पुन्हा वाढीचे संकेत आहेत. सप्टेंबरमध्ये लागवड केलेले कांद्याचे पीक पावसामुळे वाया गेले.

त्यानंतर आता डिसेंबरमध्ये नवीन कांद्याची आवक होईल. यादरम्यान सुमारे दोन महिने वाढणारी मागणी पाहता कांदा महागण्याची चिन्हे आहेत. गेल्या आठवड्यात शहरातील बाजारात कांद्याचे किरकोळ तर २० रुपये किलो होते. तर घाऊक बाजारात १५ ते १६ रुपये दराने कांदा विक्री झाला होता. आता मात्र किरकोळ बाजारात हे दर २५ रुपये झाले. बाजार समितीच्या लिलावात कांद्याला १८ ते २० रुपयांपर्यंत दर मिळत आहे. दरम्यान, भुसावळ तालुक्यातील पूर्व भागात कांदा पिकाचे नुकसान झाले आहे.

चाळीतील कांद्याचे नुकसान
नवीन कांद्याची लागवड सध्या सुरू आहे. साधारण डिसेंबर महिन्यात हा कांदा बाजारात येईल. चाळीत साठवणूक केलेल्या कांद्याचे देखील पावसाने नुकसान झाले. यापुढील काळातही दरवाढीचे संकेत आहेत. - नीलेश माळी, आडत व्यापारी, भुसावळ

बातम्या आणखी आहेत...