आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कांद्याचे दर:आवक वाढल्यामु‌ळे कांद्याचे दर घसरले ; उत्पादन खर्चही निघत नसल्याची स्थिती

भुसावळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कांद्याची आवक वाढल्याने गेल्या पंधरवड्यात असलेले कांद्याचे दर प्रतिक्विंटल ६८७ ते ७५० रुपयांवरून ४३७ ते ५५० रुपयांपर्यंत खाली आले. भुसावळ तालुक्यातील साकरी, फेकरी, वरणगाव, तळवेल, वेल्हाळे आदी परिसरात कांद्याचे उत्पादन घेतले जाते. हा कांदा भुसावळ बाजार समिती व किरकोळ बाजारात विक्री केला जातो. हा कांदा ४३७ ते ५०० रुपये तर चांगल्या प्रतीचा कांदा ७५० रुपयांपर्यंत विक्री केला जात होता. मात्र, गेल्या आठवड्यापासून बाजारात आवक वाढल्याने कांद्याचे दर पडले. व्यापाऱ्यांकडून कांद्याची खरेदी अल्पदराने होत असल्याने शेतकऱ्यांचा अपेक्षाभंग होत आहे. अल्प दरामुळे शेतकऱ्यांनी कांद्याची रवानगी कांदा चाळीत करण्यावर भर दिला आहे. दरम्यान, दोन ते तीन वर्षांपासून उन्हाळी कांद्याला समाधानकारक भाव मिळाला. त्यामुळे यंदा शेतकऱ्यांनी उन्हाळी कांद्याची विक्रमी लागवड केली होती. मात्र, खर्चही निघाला नाही, असे वेल्हाळे येथील शेतकरी डेबा पाटील यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...