आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फायदा:कांद्याचे दर वाढले, पण शेतकऱ्यांना फायदा नाही

भुसावळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

परतीच्या पावसामुळे कांदा पिकाचे नुकसान झाले. यामुळे नोव्हेंबर महिन्यात नवीन कांद्याची बाजारातील आवक कमी झाली. आता नवीन कांदा डिसेंबरमध्ये बाजारात येईल. तोपर्यंत कांद्याचे दर चढे राहण्याची शक्यता आहे. कारण, गेल्या महिन्यात कांद्याला ८०० ते १ हजार रुपये क्विंटलचे दर होते. सध्या हे भाव १९०० रुपयांपर्यंत पोहोचले.

लिलावात चांगले दर मिळत असले तरी भुसावळ तालुक्यातील शेतकऱ्यांकडे साठवणूक केलेल्या कांद्याचे प्रमाण अत्यल्प आहे. कारण, तालुक्यातील पूर्व भागातील साकरी, फेकरी, तळवेल, मन्यारखेडा, फुलगाव, पिंपळगाव, वेल्हाळे परिसरात कांदा लागवड होत असली तरी बहुसंख्य शेतकऱ्यांकडे कांदा चाळ नाही. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसतो.

कांदा पीक नुकसानदायक
कांदा पीक घेताना एकरी ३५ हजारांपर्यंत खर्च होतो. एवढे करून भाव मिळेलच ही शाश्वती नसल्याने अनेक शेतकरी कपाशी लागवड करतात. नागो पाटील, शेतकरी. वेल्हाळे

बातम्या आणखी आहेत...