आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लसीकरण:कोविशील्डचा फक्त 3 दिवसांचा साठा; कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला शहरातून वाढता प्रतिसाद

भुसावळ9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला शहरातून वाढता प्रतिसाद आहे. दरम्यान, यापूर्वी शहरात कोविशील्डचा पाच ते सात हजार व्हायल्सपेक्षा अधिक साठा राहत होता. मात्र, गेल्या आठवड्यापासून जिल्ह्यात हा साठा मर्यादीत झाल्याने भुसावळ शहरात मोजका पुरवठा होतो. सध्या पालिकेच्या आरोग्य विभागाकडे केवळ एक हजार डोस उपलब्ध आहेत. हा साठा केवळ तीन दिवस पुरेल.

देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त १८ ते ५९ या वयोगटातील लाभार्थींना १५ जुलैपासून मोफत बूस्टर डोस देणे सुरू आहे. ३० सप्टेंबरपर्यंत ही मोहीम सुरू राहील. त्यामुळे लसींची मागणी जास्त आहे. या मागणीच्या काळात लसींचा प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत कोविशील्ड लसींचा साठा पुन्हा मर्यादित झाला आहे. परिणामी लसीकरण सत्र प्रभावित होण्याची शक्यता आहे. सध्या तीन दिवस पुरेल एवढा म्हणजे केवळ १ हजार कोविशील्डचे डोस साठा शिल्लक आहेत. शहरात दिवसभरात किमान ३०० ते ३५० डोस लागतात. त्यामुळे सध्या उपलब्ध साठा सुमारे तीन दिवस पुरेल. यानंतर पुरेसा साठा उपलब्ध न झाल्यास लसीकरण मोहीम प्रभावित होऊ शकते. पण, तूर्त हा परिणाम नाही.

शहरातील लसीकरण मोहीम प्रभावित होणार नाही
भुसावळ शहरच नव्हे जिल्ह्यात कोविशील्डचा मर्यादित साठा आहे. भुसावळात हा साठा कमी असला तरी जिल्हा प्रशासनाकडे मागणी केल्यानंतर तो उपलब्ध होतो. साठ्याअभावी लसीकरण मोहीम प्रभावित होणार नाही, ही खबरदारी घेत आहोत.डॉ.कीर्ती फलटणकर, वैद्यकीय अधिकारी, पालिका

बातम्या आणखी आहेत...