आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिसाद वाढला:फक्त 45 हजार मतदारांनी केला आधार क्रमांक लिंक

भुसावळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मतदान कार्ड व आधार कार्ड लिंक करण्याची मोहीम १ ऑगस्टपासून सुरु आहे. त्यात भुसावळ तालुक्यातील ३ लाखांपैकी ४५ हजार ४६७ मतदारांनी आधार व मतदान कार्ड लिंक केले आहे. त्यात शहरातून यापूर्वी प्रतिसाद कमी होता. आता तो वाढला आहे.

मतदारांची ओळख पटवणे आणि मतदार यादीमधील नावांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी शासनाने मतदान आणि आधार कार्ड लिंक करणे अनिवार्य केले आहे. १ ऑगस्टपासून ही प्रक्रिया सुरु झाली. मात्र, भुसावळ तालुक्यात त्याला अल्प प्रतिसाद मिळत होतो. शहर आणि तालुक्यातील सुमारे ३ लाख मतदारांपैकी २४ ऑगस्टपर्यंत केवळ २० हजार ७८९ मतदारांची लिंकिंग झाली होती. यानंतर मात्र तहसील कार्यालयांकडून शहरासह तालुक्यातील ३१३ मतदान बूथच्या बीएलओ कर्मचाऱ्यांना सूचना देण्यात आली. यानंतर या आठवड्यात प्रतिसाद वाढला. दुसरीकडे निवडणूक आयोगाने केलेल्या आवाहनानुसार गणेश मंडळे मतदार व आधार लिकिंगचा उपक्रम राबवत आहेत.

बातम्या आणखी आहेत...