आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परीक्षा दहावीची:परीक्षा केंद्रात फक्त पेन, पॅड, पाणी‎ बाटली अन् कंपास नेण्याचीच मुभा‎

भुसावळ19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

‎२ मार्चपासून सुरू होणाऱ्या दहावीच्या‎ परीक्षेसाठी शहरात ८ आणि ग्रामीण‎ भागात ४ असे एकुण १२ केंद्र आहेत. तेथे‎ एकूण ४,५३६ विद्यार्थी परीक्षा देतील. ही‎ परीक्षा देताना विद्यार्थ्यांना हॉलमध्ये केवळ‎ पेन, पॅड, पाण्याची बाटली आणि कंपास‎ पेटी इतकेच साहित्य नेता येईल. काही‎ माहिती लिहिण्यासाठी कोरा कागद देखील‎ सोबत नेता येणार नाही.‎ गुरुवारी परीक्षेला सुरूवात होणार‎ असल्याने बुधवारी नियोजित केंद्रावर‎ बैठक क्रमांक टाकण्यात आले. त्यामुळे‎ सकाळी बैठक क्रमांक सूची पहाण्यासाठी‎ विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रांबाहेर गर्दी केली‎ हाेती. तत्पूर्वी, कस्टोडियन दुसाने यांनी‎ मंगळवारीच सर्व परीक्षा केंद्र प्रमुखांची‎ बैठक घेतली.

त्यात कॉपीमुक्त परीक्षा‎ अभियान यशस्वी करण्यासाठी काय‎ खबरदारी घ्यावी? बोर्डाकडून आलेल्या‎ सूचनांची माहिती दिली. दरम्यान,‎ दहावीच्या परीक्षेसाठी शहरात ७‎ तर‎ वराडसिम येथे एक असे ८ केंद्र आहेत. या‎ ८ केंद्रांवर ३,३५१ विद्यार्थी‎ २ ते २५ मार्च या‎ कालावधीत परीक्षा देतील. तालुक्यातील‎ महात्मा गांधी विद्यालय, आयुध निर्माणी‎ वरणगाव शाळा, गंगाधर सांडू चाैधरी‎ विद्यालय आणि सर्वाेदय माध्यमिक‎ विद्यालय किन्ही येथेही परीक्षा केंद्र आहे.‎ सर्व व्यवस्था पूर्ण करण्यात आली आहे.‎

११ वाजता आला तरी प्रवेश‎
एखादा विद्यार्थी सकाळी ११ वाजता‎ सेंटरवर आला तरी त्याला आत प्रवेश‎ मिळेल. मात्र ११.३० वाजेनंतर त्याला‎ पेपरला बसता येणार नाही.कारण‎ प्रश्नपत्रिका वाटून झाल्यावर उरलेल्या‎ प्रश्नपत्रिका तत्काळ सील करण्यात‎ येतील. विद्यार्थ्यांना खूप मोठी समस्या‎ आली असेल तर त्याला जवळील‎ केंद्रावर पेपर देता येईल.मात्र, ही‎ विशेष बाब असेल.‎

असे असेल नियाेजन
परीक्षार्थींनी यांनी १०.३० पर्यत शाळेत‎ हजर राहावे, १०.५० वाजता उत्तर पत्रिका दिली जाणार आहे. ११ वाजता‎ परीक्षार्थींना प्रश्न पत्रिका दिली जाणार आहे.त्यानंतर त्यांना पेपर‎ लिहीण्यास सुरूवात करता येणार आहे.११ ते २.१० इतका वेळ विद्यार्थ्यांना‎ दिला जाणार आहे.२.१० वाजेचा उत्तर पत्रिका जमा केली जाणार आहे.‎

या वस्तू नेण्यास मज्जाव‎
परीक्षार्थींना परीक्षा हॉलमध्ये‎ जाताना कोरा कागद,कॅल्युलेट‎ र,माेबाइल, इलेक्ट्राॅनिक्स‎ घड्याळ या वस्तू नेण्यास‎ मज्जाव असेल. फक्त‎ कंपास,पेन, पाण्याची‎ बाटली,पॅड, हाॅल‎ तिकीट(रिसिट), शाळेचे‎ आेळखपत्र सोबत नेता येईल,‎ याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.‎

विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना‎
उत्तरपत्रिकेच्या मुखपृष्ठावर तसेच पुरवणी उत्तर‎ पत्रिकेवर ठरावीक रकान्यात बैठक क्रमांक अंकात‎ व अक्षरात बिनचूक लिहून स्वाक्षरी करावी.‎ विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिका मिळाल्यावर व‎ पर्यवेक्षकाकडे जमा करताना ती सुस्थितीत आहे‎ किंवा नाही? याची खातरजमा करावी. उत्तरपत्रिका‎ पान ३ पासून उत्तर लिहिण्यास प्रारंभ करा.‎ उत्तरपत्रिकेच्या दोन्ही बाजूने नव्हे तर फक्त‎ डाव्या बाजूने समास साेडावा.प्रत्येक पानाच्या दोन्ही‎ बाजूस लिहावे. उत्तरपत्रिका किंवा पुरवणी‎ उत्तरपत्रकेचे काेणतेही पान फाडू नये. ही कृती‎ शिक्षापात्र आहे, याची नोंद घ्यावी.‎

पर्यवेक्षकाकडून घेतलेल्या उत्तरपत्रिकेवर व‎ पुरवणीवर पर्यवेक्षकाची स्वाक्षरी असल्याची खात्री‎ करावी. उत्तरपत्रिकेला जाेडलेल्या पुरवण्याची‎ संख्या उत्तरपत्रिकेवर पहिल्या पानावर विद्यार्थ्यांनी‎ बिनचूक लिहावी, त्यात चूक करू नये.‎ प्रश्नपत्रिका मिळाल्यावर वरील भागात प्रत्येक‎ पानावर उजव्या बाजूला स्वत:चा बैठक क्रमांक‎ लिहावा. निर्धार ीत १० मिनिटात फक्त प्रश्नपत्रिकेचे‎ वाचन करावे, मनात भीती बाळगू नये.‎ कच्चे लिखाण करावयाचे असल्यास ते‎ पेन्सिलने आणि उत्तर पत्रिकेच्या डाव्या हाताच्या‎ पानावर करावे.त्या पाना वर कच्चे लिखाण असा‎ स्पष्ट उल्लेख करावा.सुटा कागद, प्रश्नपत्रिकेवर‎ कच्चे लिखाण करू नये.‎ परीक्षार्थींनी उत्तराचा काही भाग खोडला असेल.‎ त्याला शाईत बदल करावा लागला असेल,अशा‎ ठिकाणी पर्यवेक्षकांची स्वाक्षरी घ्यावी.‎

बातम्या आणखी आहेत...