आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सावित्रीबाई‎ फुले यांच्या 190 व्या जयंती:क्रांतिज्याेती सावित्रीबाईंचे विचारच‎ समाजास पुढे नेतील : ज्योत्स्ना जाधव‎

भुसावळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कुऱ्हे पानाचे‎ स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या‎ क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचे‎ विचारच समाजाला पुढे नेऊ‎ शकतात. समाजामध्ये जे मुलींनी‎ आपल्या शिक्षणातून, कर्तृत्व सिद्ध‎ केले ते फक्त आणि फक्त‎ सावित्रीबाई यांनी घेतलेल्या अथक‎ परिश्रमामुळेच. कारण प्रसंगी दगड,‎ विटांचा मार सहन करूनही‎ सावित्रीबाई डगमगल्या नाही, असे‎ ज्योत्स्ना जाधव यांनी सांगितले.‎ यावेळी त्यांनी सावित्रीबाई यांच्या‎ जीवनावर एक गीत सादर केले.‎ भुसावळ येथील माळी भवन येथे‎ मंगळवारी क्रांती ज्योती सावित्रीबाई‎ फुले यांच्या १९० व्या जयंतीनिमित्त‎ महिला भगिनींचा कार्यक्रम‎ आयोजित केला होता.

या प्रसंगी‎ मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन‎ करून कार्यक्रमास प्रारंभ झाला. त्या‎ नंतर फुले दांपत्याच्या अतुलनीय‎ सामाजिक कार्याची माहिती देणारी‎ ओवी सादर करण्यात आली.‎ कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या‎ ज्योत्स्ना जाधव, अर्चना बंड यांनी‎ सावित्रीबाई यांच्या जीवन‎ कार्याविषयी माहिती देत मार्गदर्शन‎ केले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष‎ चारुलता महाजन, वर्षा महाजन,‎ नयना महाजन, योगिता चौधरी,‎ सरला महाजन, मालती महाजन,‎ नीता महाजन, मनीषा वानखेडे,‎ विशाखा महाजन, दीपाली माळी,‎ लीलाबाई माळी, देवयानी महाजन,‎ पल्लवी महाजन, ज्योत्स्ना जाधव,‎ उज्वला देवरे, साक्षी महाजन‎ यांच्यासह भगिनी उपस्थित होत्या.‎

बातम्या आणखी आहेत...