आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हेगारी:अर्ध्या तासातच घरी येतो सांगणाऱ्या तरुणाचा आढळला केवळ सांगाडा; बाजारपेठ पोलिसांनी पॅन्ट, चपलेवरून पटवली ओळख

भुसावळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील रामदेवबाबा नगरातील रहिवासी रोहित दिलीप कोपरकर हा २ जूनपासून बेपत्ता होता. रविवारी त्याचा कुजलेला मृतदेह सापडला. त्याची निर्घृण हत्या झाली. तसेच रोहितची एमएच.१९-डीपी.२४२३ क्रमांकाची दुचाकी बेपत्ता असल्याचे समोर आले.

भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात २ जूनला २२ वर्षीय तरुण बेपत्ता असल्याचे प्रकरण नोंदवले गेले. त्याचा तपास सुरू असतानाच रविवारी सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहामागील शेतात एक कुजलेला मृतदेह पडून असल्याची माहिती डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांना मिळाली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांना कवटी फुटलेल्या मृतदेहाचा सांगाडा आढळला. त्याच्या कंबरेखालील भागात केवळ पॅण्ट लटकत होती. पायात चप्पल होती. त्यामुळे ओळख पटवण्याचे आव्हान होते. मात्र, पोलिसांनी चार तासांतच ओळख पटवली. जळगाव येथून आलेल्या फॉरेन्सीक लॅब पथकाने मृतदेहाच्या अंगावरील कपडे, रक्ताचे नमुने व डीएनए चाचणीसाठी नमुने घेतले. सहायक पोलिस निरीक्षक मंगेश गोटला यांनी पंचनामा केला.

याप्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्यात रात्री उशीरापर्यंत खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. मृत रोहितच्या घरी आई, भाऊ, बहीण असल्याचे पोलिसांनी सांगितले. घटनास्थळी वरिष्ठांच्या भेटी घटनास्थळी अप्पर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांनी भेटी दिल्या. त्यांनी घटनेचा परिसर शोधला. मृतदेहाजवळ काही अंतरावर रक्ताने माखलेले दगड आढळले. दरम्यान, मृतदेह सापडले ते ठिकाण बाजारपेठ की तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत आहे? हे निश्चित करण्यातच पोलिस अधिकाऱ्यांचे दोन तास निघून गेले. नंतर ही घटना बाजारपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याचे ठरून तपासाला वेग मिळाला.

असा लागला तपास
बाजारपेठ पोलिस ठाण्यात २ जूनला हरवलेल्या व्यक्तीबाबत असलेली नोंद आणि मृतदेहाजवळील पॅण्ट व चप्पलचा ताळमेळ बसू लागताच पोलिसांचा संशय बळावला. यानंतर बेपत्ता रोहीत दिलीप कोपरकर याच्या कुटुंबीयांना घटनास्थळी बोलावण्यात आले. त्यांनी पॅण्ट व चप्पल वरून हा मृतदेह रोहितचा असल्याचा उलगडा केला.

आईने दिली माहिती
घटनास्थळी पोलिसांनी रोहितच्या आईकडून प्राथमिक माहिती घेतली. त्यांनी सांगितले की, रोहितचा मला फोन आला होता. मी अर्धा तासाच घरी येतो, असे त्याने सांगितले होते. तो बोलत असताना मोटारसायकलचा आवाज येत होता. यानंतर त्याचा फोन कट झाला. नंतर तो घरी परतलाच नाही, असे सांगितले.

बातम्या आणखी आहेत...