आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुणगौरव:जिद्द, अभ्यास, आत्मविश्वास असेल तरच ध्येय प्राप्ती शक्य ; भारत विद्यालयात शरद महाजन यांचे प्रतिपादन

न्हावी11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्हावी (ता.यावल) येथील बहुतांश विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेत ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवले. ही शाळेच्या दृष्टीने अतिशय अभिमानास्पद बाब आहे. विद्यार्थी जीवनात जिद्द, चिकाटी, अभ्यासू वृत्ती व आत्मविश्वास या बाबी खूप महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे जीवनात ध्येय प्राप्ती होऊ शकते, असे संस्थेचे अध्यक्ष शरद महाजन यांनी सांगितले.

भारत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष शरद महाजन होते. प्रास्ताविक मुख्याध्यापिका तिलोत्तमा चौधरी यांनी केले. दहावी व बारावी हा विद्यार्थी जीवनातील अतिशय महत्त्वाचा टप्पा असतो. पुढील शैक्षणिक वाटचालीत चांगली गती प्राप्त करायची असेल तर ध्येय निश्चित करायला हवे, असे त्या म्हणाल्या. संस्थेचे उपाध्यक्ष अनिल लढे यांनी, मिळवलेल्या यशाने हुरळून न जाता यापुढेही चांगला अभ्यास करा. ध्येय साध्य साधायचे असेल तर वाचन व संस्कृती जोपासा. वाचनाने मनुष्य समृद्ध होतो असे सांगितले. संस्थेचे चेअरमन पी.एच.महाजन यांनी संवाद साधला. विद्यार्थ्यांमधून नोहाली महेश चोपडे, तेजस शशिकांत ढाके, सुमित कमलाकर चौधरी, खुशबू कमलाकर चौधरी, मानसी अनिल श्रीखंडे यांनी मनोगत व्यक्त केले.

यानंतर विद्यार्थ्यांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष शरद महाजन, उपाध्यक्ष अनिल लढे, चेअरमन पी.एच.महाजन, सचिव हर्षद महाजन, डॉ.के.जी. पाटील, अविनाश फिरके, एल.के.चौधरी, वामन नेहेते, जयंत बेंडाळे, नारायण कोलते, सुरेश चौधरी, रवींद्र कोलते, संदेश महाजन, सागर चौधरी, मुख्याध्यापिका तिलोत्तमा चौधरी, उपमुख्याध्यापिका पुष्पा चोपडे, पर्यवेक्षक एन.एन.अजलसोंडे यांच्या हस्ते झाला. सूत्रसंचालन समिती प्रमुख शोभा तळेले, तर आभार एस.एम.दुसाने यांनी मानले.

बातम्या आणखी आहेत...