आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथील पालिकेत सत्ताधारी शिवसेनेने स्वीकृत नगरसेवकपदी माजी शहरप्रमुख राजेश नानवाणी यांची वर्णी लावली. ते १९९७ पासून २००९ पर्यंत सलग १२ वर्षे शिवसेनेचे बोदवड शहरप्रमुख होते. या माध्यमातून एका निष्ठावंत शिवसैनिकाला न्याय दिल्याच्या प्रतिक्रिया उमटल्या.
पालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकल्यानंतर नानवाणी यांना पक्ष निष्ठेचे फळ मिळत स्वीकृत नगरसेवक पद सोपवण्यात आले. त्यांचा सत्कार करतेवेळी नगराध्यक्ष आनंदा पाटील, संजय गायकवाड, नगरसेवक सईद बागवान, माजी उप नगराध्यक्ष दिनेश माळी, सुनील बोरसे, नीलेश माळी, गोलू बरडिया, हर्षल बडगुजर, नितीन चव्हाण, मयूर बडगुजर, व्यापारी संघटनेचे तालुकाध्यक्ष गोपाल अग्रवाल, गिरधारी पंजवाणी, कैलास जावरे, अतुल अग्रवाल, अजय अग्रवाल, गोपाल पाटील, मनोज पाटील, कलिम शेख, शांताराम कोळी, राहुल शर्मा उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.