आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑनलाइन अर्ज सुरु:यूपीएससीद्वारे सैन्यात काम करण्याची संधी

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

यूपीएससीच्या संयुक्त संरक्षण सेवा परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे. या प्रवेश प्रक्रियेच्या माध्यमातून सैन्यदल, हवाईदल आणि नौदलात अधिकारी म्हणून काम करण्याची संधी तरुण-तरुणींना मिळेल. त्यासाठी १० जानेवारीपर्यंत अर्जाची मुदत आहे.

यूपीएससीतर्फे वर्षातून दोन वेळा सीडीएस प्रक्रिया राबवली जाते. या प्रक्रियेतून मिलिटरी अकॅडमी चेन्नई येथील ऑफिसर्स नेव्हल अकॅडमी आणि एअर फोर्स अकॅडमीत प्रशिक्षण घेण्यासाठी प्रवेश मिळतो. नुकतीच यूपीएससीतर्फे २०२३मध्ये होणाऱ्या सीडीएस परीक्षेबाबत सुचना जाहीर झाली. त्यानुसार इच्छुकांना १० जानेवारीपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करता येईल.

बातम्या आणखी आहेत...