आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्स्फूर्त प्रतिसाद‎:धनाजी नाना महाविद्यालयात वक्तृत्व‎ स्पर्धेचे आयोजन, उत्स्फूर्त प्रतिसाद‎‎ ‎ ‎ ‎

‎ ‎ ‎ फैजपूर‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

‎येथील धनाजी नाना‎ महाविद्यालयातील सण उत्सव‎ समिती आणि राष्ट्रीय सेवा योजना एकाकातर्फे, अल्पसंख्यांक हक्क ‎ ‎ दिवसानिमित्त वक्तृत्त्व स्पर्धेचे‎ आयोजन झाले.‎ स्पर्धेत वर्षा परदेशी, ईशा‎ भावसार, आशिष सैतवाल, ईश्वर‎ पाटील यांनी आपल्या भारतीय‎ समाजातील अल्पसंख्यांक‎ समाजातील योगदान याबद्दल‎ माहिती सांगितली. डॉ.शरद बिऱ्हाडे‎ यांनी अल्पसंख्यांक समुदाय जैन,‎ बौद्ध, पारशी समाजातील रूढी‎ परंपरा व संस्कृतिचे महत्त्व, अनेक‎ नामवंत जसे जे.आर. डी.टाटा,‎ सायरस पुनावला यांचे सामाजिक,‎ आर्थिक, शैक्षणिक योगदान याबद्दल‎ माहिती सांगितली.

या अल्पसंख्याक‎ समुदायाप्रती हक्क दिवस साजरा‎ करून या समुदायाप्रती कृतज्ञता‎ व्यक्त करण्याचा संकल्प केला.‎ कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.दीपक‎ सुर्यवंशी यांनी केले. तर आभार‎ डॉ.शेरसिंग पाडवी यांनी मानले.‎ यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी‎ उपस्थित होते. स्पर्धेला विद्यार्थ्यांचा‎ मोठा प्रतिसाद लाभला.‎

बातम्या आणखी आहेत...