आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदेश:वाहन चोऱ्या रोखण्यासाठी फुटेज तपासण्याचे आदेश

भुसावळ4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील ज्या भागात दुचाकी चोरीचे प्रमाण जास्त आहे, ते स्पाॅट मार्क करा. त्या भागात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासा, असे आदेश नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डाॅ.बी.जी.शेखर पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिले.

भुसावळात गेल्या सहा महिन्यांतच ६० पेक्षा जास्त दुचाकी चाेरीला गेल्या आहेत. या गुन्ह्यांचा तपास लागत नसून चोरट्यांचे फावते. भुसावळ शहर, बाजारपेठ व तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत वाहन चोरीचे किती गुन्हे दाखल आहेत? त्यापैकी किती गुन्ह्यांचा तपास लागला, याचा आढावा विशेष महानिरीक्षक डॉ.बी.जी.शेखर पाटील यांनी भुसावळ भेटीत घेतला.

बातम्या आणखी आहेत...