आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील किनगाव येथे जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी केंद्रस्तरीय सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन केले होते. जिल्ह्यात पहिल्यांदा असा उपक्रम राबवण्यात आला. त्यातील विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. किनगाव येथे केंद्रप्रमुख प्रमोद सोनार यांच्या संकल्पनेतून केंद्रस्तरीय सांस्कृतिक स्पर्धा पार पडल्या. उद्घाटन सरपंच निर्मला संजय पाटील यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच लुकमान तडवी, गटशिक्षण अधिकारी विश्वनाथ धनके, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र पाटील, संजय पाटील, केंद्रप्रमुख महंमद तडवी, प्रमोद सोनार, गुंज फाउंडेशनचे समन्वयक रोहित पवार उपस्थित होते.
सहा प्रकारात झालेल्या स्पर्धांमध्ये विविध १२ शाळांमधील १९३ विद्यार्थ्यांनी ३२ कलाप्रकारांचे सादरीकरण केले. परीक्षक म्हणून ‘अंबाली'' शाॅर्ट फिल्म कलाकार बाबूलाल पाटील व केंद्रप्रमुख प्रमोद सोनार यांनी काम पाहिले. विजयी स्पर्धकांना ट्रॉफी व प्रमाणपत्रे देऊन गौरवण्यात आले. स्पर्धा यशस्वितेसाठी हिमंत पाटील, गिरीश सपकाळे, नितीन पाटील, श्याम माळी, डिगंबर महाजन, अजित तडवी, नितीन अहिरे, अमोल तिजारे, सुपडू कोळी, शरद गावडे, सुशील पाटील, भिला महाजन, संजय ठाकरे, नितीन साठे आदींनी सहकार्य केले. दरम्यान या सांस्कृतिक स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले हाेते. अापल्यातील सुप्त कलागुणांना वाव मिळाल्याने अानंदाचे वातावरण हाेते. विद्यार्थी परस्परांना प्राेत्साहन देत हाेते. विविध शाळांमध्ये चुरशीचे वातावरण असल्याने विद्यार्थ्यांत उत्साह हाेता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.