आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथील खंडेराव मंदिर देवस्थानाकडून गुरुवारी बारा गाड्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कुठलाही अनुचित प्रकार न घडता उपस्थित जनसागराच्या साक्षीने बारा गाड्या ओढण्यात आल्या. गावकऱ्यांच्या सहकार्याने कार्यक्रम निर्विघ्नपणे पार पडला. गुरुवारी संध्याकाळी चार वाजता खंडेराव मंदिर परिसरातून भगत, देवस्थानचे विश्वस्त, व ग्रामस्थांच्या उपस्थितीत मिरवणूक निघाली. नंतर भारत विद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर बारागाड्यांना पाच फेऱ्या मारून मानकरी भगत यांच्या कमरेला गाड्यांचा हुक अडकवून बारा गाड्या ओढण्यात आल्या. या वर्षी हा मान चंद्रकांत गाजरे यांना मिळाला. लोकांची गर्दी उसळली होती. यात्रेचा आनंद परिसरातील भक्तांनी घेतला. खंडेराव मंदिराचे सर्व पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच, ग्रा.पं.सदस्य, आरोग्य विभाग, महावितरणीचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.