आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयोजित:राज्यस्तरीय मेळाव्याचे आयोजित; आदिवासी कोळी महासंघाचा अकोला येथे रविवारी मेळावा

तांदलवाडी10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आदिवासी कोळी महासंघ व आदिवासी संघर्ष समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने, अकोला येथे रविवारी दि.१९ रोजी सकाळी नऊ वाजेला राज्यस्तरीय मेळाव्याचे आयोजित करण्यात आला आहे.

मेळाव्यात महादेव कोळी, टोकरे कोळी, ढोर कोळी, मल्हार कोळी, हलबा, मन्नेरवारलू, ठाकर, ठाकूर, मन्नेरवार इत्यादी जमातीच्या पदाधिकाऱ्यांचा राज्यस्तरीय मेळावा, आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे, महर्षी वाल्मिकी शिक्षण संकुल, जुने ग्रामपंचायत कार्यालयाजवळ, गोरक्षण रोड अकोला येथे होणार आहे. आदिवासी कोळी महासंघ व आदिवासी संघर्ष समिती महाराष्ट्र राज्याचे संस्थापक माजी कॅबिनेट मंत्री डॉ. दशरथ भांडे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहतील. मार्गदर्शक म्हणुन औरंगाबाद उच्च न्यायालयाचे अॅड. सुशांत येरमवारप, अॅड.प्रतापराव जाधववर, नागपूरचे निवृत्त उपजिल्हाधिकारी हेमंत पवार, दलित साहित्य अकादमी महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष प्रा.संजय मोरे, आदिवासी कोळी महासंघ व आदिवासी संघर्ष समिती उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रल्हाद सोनवणे, जिल्हा अध्यक्ष प्रा.सुभाष सपकाळे उपस्थित राहतील.

राज्य शासनाकडील प्रमुख मागण्या अशा
महाराष्ट्र राज्यामध्ये १९७६ पासून ३० टक्के लोकांनाच टोकरे कोळी प्रमाणपत्र मिळाले आहे. ७० टक्के नागरिक आजतागायत यापासून वंचित आहे. त्यांना नोकरी व इतर स्वरूपाच्या लाभातून वंचित रहावे लागते. त्यामुळे प्रमाणपत्र मिळावे, ७ जून २०२१ चा आदिवासी विकास विभागाचा १ कोटी ३० लाख आदिवासींना नामशेष करणारा आदेश रद्द करावा.

बातम्या आणखी आहेत...