आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना वृत्त:जिल्ह्यातील नवीन पाच पैकी चार रुग्ण एकट्या भुसावळ तालुक्यातील

भुसावळ9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात गेल्या पंधरवड्यापासून कोरोना संशयितांच्या संख्येत वाढ होत आहे. सोमवारी केलेल्या अॉटिजेन टेस्टच्या माध्यमातून पाच संशयित समोर आलेत. त्यात जळगाव शहरातील एक तर भुसावळ येथील चार रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, तीन रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील संशयित रुग्णांची आकडा १८ झाला आहे. यात जळगाव शहर २, भुसावळ ८, चोपडा २, यावल ५, इतर जिल्ह्यातील १ रुग्ण आहे तर जळगाव १, चोपडा १ व धरणगाव १ रुग्ण बरा झाला आहे. रुग्ण वाढल्याने भुसावळ आरोग्य विभाग सतर्क झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...