आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभगवान विश्वकर्मा नाम सप्ताह आणि जन्मोत्सवाची परंपरा सुरू आहे. यंदाही नाम सप्ताहासह अनेक धार्मिक सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. रथसप्तमीपासून प्रारंभ झालेला या नाम सप्ताहात सात दिवसापासून भगवान विश्वकर्मांचे अखंडपणे नामस्मरण केले जात आहे. काकडा आरती, हरिपाठ, भजन, सत्संग, कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. पाथरवट समाजातील मुलामुलींच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा, या हेतूने गुरुवारी मंदिराच्या प्रांगणात नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. नृत्य स्पर्धेत लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत अनेक मुला-मुलींनी सहभाग नोंदवला.
शुक्रवार पहाटे भगवान विश्वकर्मांचा जन्मोत्सव मान्यवरांचा केला सत्कार Share with facebookनाम सप्ताहामध्ये ज्यांचे सहकार्य लाभले त्यांचा सत्कार मंडळातर्फे करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष श्रीकृष्णा पाथरवट, उपाध्यक्ष विनोद उबाळे, सचिव संजय पेभरे, खजिनदार वासुदेव पाथरवट, कार्याध्यक्ष प्रभाकर रणदिवे, सदस्य ईश्वर नागपुरे, सुभाष टोकेकर उपस्थित होते. सत्कार सोहळ्यानंतर प्रल्हाद डाके महाराज यांनी काल्याचे कीर्तन केले.
सोहळा पार पडला. या सोहळ्याच्या निमित्ताने समाज बांधवांच्या माध्यमातून पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या पालखी सोहळ्यामध्ये समाजातील मुला मुलींचे तसेच पुरुष व महिला भाविकांचे लेझीम पथक भुसावळ शहरवासीयांसाठी आकर्षण ठरले. भगवे फेटे आणि पांढरा कुर्ता अशा पेहरावात लेझीम पथकाने लक्ष वेधले. टाळकरी वारकरी संप्रदायाच्या परंपरेचा देखावा देखील मंडळातर्फे सादर करण्यात आला होता. मिरवणुकीनंतर नृत्य स्पर्धेतील विजेत्यांचे बक्षीस वितरण झाले. नृत्य स्पर्धेचे आयोजन योगेश उबाळे यांनी केले. माजी नगराध्यक्ष तथा जय गणेश फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष उमेश नेमाडे, माजी नगरसेवक परीक्षित बऱ्हाटे, दीपक धांडे उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.