आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालिकेचे दुर्लक्ष:भुसावळात दुभाजक रस्त्याच्या समांतर; ठिकठिकाणी साचताहेत कचऱ्याचे ढिग, सुशोभिकरण गरजेचे

भुसावळ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील प्रमुख मार्गांवरील दुभाजक उभारणीची कामे रखडली आहेत. यामुळे पालिकेचे पावसाळ्यात दुभाजक सुशोभिकरणाचे नियोजन फोल ठरण्याची भीती आहे. शहरातील दुभाजकांची स्थिती बिकट झाल्याने या ठिकाणी आता कचऱ्याचे ढिग साचू लागले आहेत. पावसाळ्यापूर्वी रस्ता दुभाजकांची कामे पूर्ण होणे गरजेचे आहे.

डीपीडीसीमधून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शहरातील पालिकेचा मुख्य दवाखाना असलेल्या श्री. संत गाडगेबाबा रुग्णालय ते श्री. छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुलामागील मान रेसिडेन्सी परिसरातील बलबलकाशी पुलापर्यंतच्या रस्त्याचे काँक्रीटीकरण, तसेच शहरातील प्रमुख मार्गावरील रस्ता दुभाजकांची निर्मिती करण्यासाठी साडेपाच कोटी रुपयांचा निधी दिला होता. यानंतर भूमीपूजन होऊन रस्ता काँक्रीटीकरण कामाला सुरुवात झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुलाजवळील एकेरी मार्गाचे काम पूर्ण झाले असून उर्वरित कामेही पूर्ण होतील. मात्र अद्यापही दुभाजकांची स्थिती जैसे थे आहे. उन्हाळ्याच्या काळात रस्ते दुभाजक तयार होऊन आगामी पावसाळ्यात त्यात शोभिवंत फुलझाडांची लागवड करता येईल. यामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडेल, मात्र निविदा प्रक्रिया व भुमीपूजन झाल्यानंतरही या कामाला अद्याप मुहूर्त गवसला नाही.

दुभाजक रस्त्याला समांतर
अष्टभुजा देवी मंदिर ते थेट नाहाटा चौफुलीपर्यंत रस्ते दुभाजक रस्त्याच्या समांतर पातळीपर्यंत पोहोचले आहेत. यामुळे दुभाजक असूनही नसल्यासारखे आहेत. तर यावलरोड, जळगावरोडवर दुभाजकांमध्ये कचरा साचला आहे. यामुळे अस्वच्छता वाढत आहे. दुभाजकांची स्थिती बिकट झाल्याने, रस्त्यांवर ओंगळवाणे चित्र दिसत आहे.

बातम्या आणखी आहेत...