आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दखल:पारावरची शाळा , क्षेत्रभेटीतून व्यवहार ज्ञान ; मांडवेदिगरचे जि.प.शाळेचे शिक्षक रवींद्र पढार यांना आदर्श पुरस्कार घोषित

भुसावळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अवघी अडीच हजार लोकसंख्या व ७५ विद्यार्थी संख्या असलेल्या मांडवेदिगर या तांड्यावरील शाळेचे रवींद्र माणिक पढार यांनी व्ही-स्कूल अॅपवर पाठनिर्मिती केली. कोरोना काळात ‘पारावरची शाळा’ हा उपक्रम राबवला. आता शाळा सुरू झाल्यानंतरही ते ऑनलाइन गृहपाठ, क्षेत्रभेटीतून व्यवहार ज्ञान देणे आणि तारखेनुसार पाढे पाठांतर ही संकल्पना राबवत आहे. विद्यार्थ्यांच्या स्मरणात राहील, अशा पद्धतीने शिकवण्याचे तंत्र वापरात त्यांचा हातखंडा आहे. या कामाची दखल घेत जिल्हा परिषदेने त्यांची यंदाच्या ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कारासाठी निवड केली आहे.

मांडवेदिगर येथील जि.प.शाळेत पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांची संख्या केवळ ७५ आहे. कोरोना काळात इतर ठिकाणांप्रमाणे ही शाळा देखील बंद होती. यामुळे ऑनलाइन शिक्षणाच आधार होते. मात्र, पढार यांनी ‘पारावरची शाळा’ हा उपक्रम राबवून कमी गर्दीत कोरोनाचे नियम पाळून प्रत्यक्ष शिक्षणही दिले. नंतर व्ही स्कूल अॅपमधील तिन्ही टप्प्यात प्राथमिक वर्गांची पाठनिर्मिती, कंटेंट तयार केला. व्हीडिओ, पीडीएफ, ऑडिओ व टेक्स्ट यामुळे विद्यार्थ्यांना अध्ययन सुलभ होते. शाळेत शैक्षणिक साहित्य निर्मिती व त्याचा अध्यापनात प्रभावी वापर केला. यामुळे शिक्षण आनंददायी होण्यास मदत झाली. आता त्यांनी ‘ऑनलाइन गृहपाठ’ ही संकल्पना राबवली आहे. त्यास व्हाॅट्सअॅपवर विद्यार्थ्यांचे वर्गनिहाय ग्रुप तयार केले. त्यावर त्यांना गृहपाठ दिला जातो. त्यामुळे पालकांनादेखील माहिती मिळते. ते अभ्यासासाठी मदत करतात.

पाढे पाठ करण्यासाठी नवीन संकल्पना
शिक्षक रवींद्र पढार यांनी ‘तारखेनुसार पाढा’ ही संकल्पना राबवली. यामुळे २ ते ३० पर्यंतचे पाढे विद्यार्थ्यांच्या तोंडीपाठ आहेत. ५ तारखेला पाचचा, तर ३० तारखेला ३०चा पाढा विद्यार्थ्यांकडून म्हणून घेतला जातो. अंकगणित सोडवताना पाठ असलेल्या पाढ्यांचा विद्यार्थ्यांना उपयोग होतो.

व्यवहार ज्ञानासाठी क्षेत्रभेटीवर दिला भर
विद्यार्थ्यांना एखादी प्रक्रिया, व्यवहार समजावा यासाठी शिक्षक पढार हे क्षेत्रभेटींवर भर देतात. त्यात विद्यार्थ्यांना जि.प.च्या आरोग्य केंद्रात नेऊन आरोग्याची काळजी कशी घ्यावी? तेथील कामकाजाची माहिती दिली. किराणा दुकान, शेती, बँक, गॅरेज आदी ठिकाणी नेवून तेथे चालणारी कामे, व्यवहार शिकवले.

बातम्या आणखी आहेत...