आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हरकती घेता येणार:परसाडे, मालोद ग्रुप ग्रा.पं; प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध, 17 जूनपर्यंत सूचना

यावल16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील परसाडे बुद्रुक व मालोद ग्रुप ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीची तयारी प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी या दोन्ही ग्रामपंचायतींची प्रारूप मतदार यादी मंगळवारी प्रसिद्ध करण्यात आली. या यादीवर १४ ते १७ जूनपर्यंत हरकती मागवण्यात आल्या आहे. ही मतदार यादी ग्रामपंचायत व तलाठी कार्यालयांच्या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आली.

परसाडे बुद्रूक व मालोद या दोन ग्रामपंचायतीचा कार्यकाळ संपल्याने त्यांची सार्वत्रिक निवडणूक तयारी प्रशासनाने सुरू केली. परसाडे बुद्रुक ग्रा.पं.च्या तीन प्रभागातील ९ जागांसाठी व मालोद ग्रुप ग्रामपंचायतीच्या पाच प्रभागातील १३ जागांसाठी सार्वत्रिक निवडणुकीची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाली. या यादीवर सूचना, हरकती मागवल्या असून नंतर त्यांची एक सुनावणी घेऊन अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी यादीतील नावांची काळजीपूर्वक पडताळणी करावी, असे आवाहन तहसीलदार महेश पवार, नायब तहसीलदार आर.डी. पाटील, सी.डी. वानखेडे, सुयोग पाटील, तलाठी टी.सी. बारेला, समीर तडवी यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...