आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावसाळ्यानंतर जागोजागी खड्डे:खड्डेमय जामनेर रोडवर अखेर पॅचवर्क‎

भुसावळ‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील सर्वाधिक खड्डेमय ‎असलेल्या जामनेर रोडच्या‎ डागडुजीचे काम पालिकेने‎ मंगळवारी हाती घेतले. या रस्त्यावर ‎ ‎ पाणीपुरवठा करणाऱ्या‎ पाइपलाइनची दुरुस्ती करण्यासाठी‎ खोदकाम करण्यात आले होते. या‎ खोदकामानंतर रस्त्यावर खड्ड्यांचे‎ जंजाळ वाढले होते. पालिकेने संपूर्ण‎ रस्त्यावर पॅचवर्क केल्याने‎ वाहनधारकांना दिलासा मिळाला.‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎

शहरातील रस्त्यांच्या कामांना‎ पालिकेकडून प्राधान्य दिले जात‎ आहे. १२ कोटी रुपये निधीतून‎ होणाऱ्या कामांमध्ये मात्र जामनेर‎ रोडचा समावेश नाही. यामुळे गेल्या‎ काही महिन्यांमध्ये विशेषत:‎ पावसाळ्यानंतर या रस्त्याची स्थिती‎ बिकट झाली होती. पालिकेने‎ मंगळवारी जामनेर रोडवरील‎ पांडुरंग टॉकीज ते थेेट नाहाटा‎ चौफुलीपर्यंतच्या रस्त्यावर पॅचवर्क‎ केल्याने दिलासा मिळाला.‎

पालिकेने मंगळवारी शहरातील जामनेर रोडवरील खड्डे बुजवून रस्ता चकाचक केला.‎रखडलेल्या इतरही कामांना पालिका देणार गती‎‎ शहरातील रस्त्यांचे प्रश्न पालिकेच्या माध्यमातून मार्गी लागत आहेत. रस्ते‎ विकास, सुशोभिकरणावर भर आहे. जामनेर रोडवरील सर्व खड्डे डांबरीकरण‎ पॅचवर्क करुन बुजवले. इतरही रखडलेल्या कामांना गती मिळेल, असे‎ मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांनी सांगितले.‎

बातम्या आणखी आहेत...