आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:नियोजन मंडळाच्या सभेत देण्याचा मार्ग मोकळा; स्वामीनारायण मंदिर अन् सोमवारगिरी मढीचा समावेश

सावदा12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील मोठा आड परिसरातील श्री स्वामीनारायण मंदिर व कमल टॉकीज समोरील श्री सोमवारगिरी मढी देवस्थानाला ‘क’वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा, १७ रोजी जिल्हा नियोजन मंडळाच्या सभेत देण्याचा मार्ग मोकळा झाला. पालकमंत्री तथा नियोजन मंडळाचे अध्यक्ष गुलाबराव पाटील यांनी याबाबत घोषणा केली.

जिल्हा नियोजन मंडळाची बैठक शुक्रवारी झाली. त्यात आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मागणीनुसार पालकमंत्र्यांनी, दोन्ही तीर्थस्थळांना ‘क’वर्ग दर्जा जाहीर केला. भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्री स्वामीनारायण मंदिर व सोमवारगिरी मढी देवस्थान, येथे दरवर्षी येथे मोठे उत्सव होतात.

त्यामुळे परिसराचा विकास व्हावा यासाठी सोमवारगिरी मढीचे विश्वस्त कृष्णगिरीजी महाराज, स्वामींनारायण मंदिराचे धर्मप्रसाद दासजी, कोठारी राजेंद्रप्रसाद दासजी, माजी नगरसेवक धनंजय चौधरी, शिवसेना शहरप्रमुख सुरज परदेशी, शिवसेना सचिव शरद भारंबे, युवासेना प्रमुख मनीष भंगाळे, भरत नेहते, संघटक नीलेश खाचणे, शिवाजी भारंबे, बापू भारंबे, अतुल नेमाडे यांनी याबाबत पाठपुरावा केला. शहरातील खंडेराव संस्थाननंतर अन्य दोन देवस्थानांना क वर्गाचा दर्जा मिळाला आहे. बैठकीत सावदा शहरातील तीर्थक्षेत्र खंडोबा देवस्थानासाठी आमदार चंद्रकांत पाटील यांनी भरीव निधीची मागणी केली.

बातम्या आणखी आहेत...