आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निधी मंजूर:मॉडर्न रोडवर ३० लाख खर्चातून पेव्हर ब्लॉक

भुसावळ3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील मुख्य बाजारपेठेतील मॉडर्न रोडवर सिलकोट व कारपेटचे काम अपूर्ण आहे. मात्र, नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या परिक्षेत्रात अधिसूचित विशिष्ठ नागरी सेवा व सुविधा पुरवण्यासाठी नगरविकास विभागाने निधी उपलब्ध करुन दिला आहे.

३० लाख रुपयांच्या निधीतून येथे पेव्हर ब्लॉक बसवले जातील. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून होणाऱ्या या कामाला पालिकेने ना-हरकत दिली आहे. शहरात १२ कोटी रुपयांच्या निधीतून रस्ते डांबरीकरणाला सुरुवात झाली. त्यात मॉडर्न रोडचे काम अपूर्ण राहिले. या मार्गावर अद्यापही सिलकोट व कारपेट झालेले नाही. ही समस्या सोडवण्यासाठी आमदार संजय सावकारे यांनी शासनाकडे निधीची मागणी केली होती. त्यानुसार निधी मंजूर झाला.

बातम्या आणखी आहेत...