आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआगामी १० रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे. त्यासह इतर सण उत्सवांचा सर्वांनी आनंद घ्यावा. सामाजिक सलोखा कायम राखण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे. धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाहीत, याची सर्वांनी काळजी घ्यावी, सोशल नेटवर्कद्वारे पसरवल्या जाणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर यांनी केले.
यावल पोलिस ठाण्यात आयोजित शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते. सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक घेण्यात आली. अफवा पसरवणाऱ्यांची माहिती पोलिसांना कळवावी, असे आवाहन पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर यांनी केले. या बैठकीमध्ये माजी नगराध्यक्ष चंद्रकांत देशमुख, हाजी शब्बीर खान मोहम्मद खान, भाजपा शहराध्यक्ष डॉ.नीलेश गडे, शिवसेनेचे शरद कोळी, हाजी ताहेर शेख चांद, अनिल जंजाळे, पवन पाटील, मोहसीन खान, अजहर खाटीक, माजी नगरसेवक मनोहर सोनवणे, सय्यद युनूस, हाजी इकबाल खान, हबीब हाजी गफ्फार शाह आदी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.