आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासातपुड्यातून होणाऱ्या वन संपदेच्या अवैध वाहतुकीविरुद्ध वन विभागाने मोहीम उघडली आहे. त्यात २५ किलो डिंक वाहतुकीचा परवाना घेतलेला असताना प्रत्यक्षात १० क्विंटल डिंकाची अवैध वाहतूक करणारे वाहन वनपरिक्षेत्र अधिकारी अजय बावणे यांनी सापळा रचून पकडले. आठवडाभरात अवैध डिंक वाहतुकीविरुद्धची ही चौथी कारवाई आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी बावणे कर्मचाऱ्यांसह गस्त करत होते. जिन्सी गावाजवळ टाटा सुमो वाहन (क्रमांक एमएच.२१-बी.०८५२ ) चौकशीसाठी थांबवण्यात आले. त्यात गौण वन उपज (सलई डिंक) मिळून आला.
या वाहन चालकाकडे वाहतूक परवाना मागितला. त्याने परवाना क्रमांक १८५३ (४ मार्च २३) दाखवला. त्यात सलई डिंक १० किलो व धावडा डिंक १५ किलो असा एकूण २५ किलो वाहतुकीस मंजुरी होती. यानंतर पथकाने वाहनाची तपासणी केल्यावर त्यात तब्बल ९ क्विंटल ९९ किलो १७० ग्रॅम सलईचा डिंक आढळला. धावडा डिंक वाहनात आढळला नाही. वाहतूक परवान्याव्यतिरिक्त उर्वरित डिंकाची विनापरवाना वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आल्याने १ लाख रुपये किमतीचे वाहन व १ लाख ९ हजार ९०८ रुपयांचा सलईचा डिंक असा एकूण २ लाख ९ हजार ९०८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई वनपरिक्षेत्र अधिकारी अजय बावणे, वनपाल राजेंद्र सरदार, अरुणा ढेपले, वनरक्षक रमेश भुतेकर, उत्तम पवार, राज तडवी, रुस्तम तडवी, बालू राठोड यांनी केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.