आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
इंधनाच्या वाढत्या किमती सर्वसामान्यांसाठी चिंतेचा विषय आहे. त्यामुळे भुसावळ येथील व्यावसायिकाने इलेक्ट्रिक दुचाकी तयार करून या समस्येवर मात केली अाहे. मोपेड दुचाकीच्या इंजिनात कोणतेही बदल न करता त्यांनी या दुचाकीला इलेक्ट्रिक बाईकमध्ये रुपांतरीत केले आहे. त्यामुळे पेट्रोलची गरज उरली नसून, प्रदूषण होत नसल्याने पर्यावरण संवर्धनालाही हातभार लागत आहे.
भुसावळ येथील न्यू महाजन इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड सोलर सर्व्हिसेसचे संचालक महेंद्र ज्ञानदेव महाजन यांनी हा प्रयोग केला आहे. त्यांच्या मोपेड दुचाकीला ३० ते ३५ किमी प्रतिलिटर अॅव्हरेज मिळत होता. दुचाकीचा खर्च न परवडणारा होता. त्यामुळे त्यांनी हा प्रयोग केला.
घरातील पंख्याचे तंत्रज्ञान
घरातील पंख्यात ज्या प्रमाणे इलेक्ट्रीक एनर्जीचे मॅग्नेटिक एनर्जीमध्ये रुपांतरीत होते. त्यामुळे पंखा गोल फिरू लागतो. याच तंत्राचा वापर करून इलेक्ट्रीक एनर्जीवर दुचाकी चालवण्याचे तंत्र वापरून , महाजन यांनी डिस्क तयार केली व कॉईल मोटर मुंबईतून मागवली. दुचाकीत बदल करताना त्यांना शहरातील गणेश ऑटो गॅरेजचे मोहन मेहरे यांनी मदत केली. तंत्राचा वापर करून इलेक्ट्रीक एनर्जीवर दुचाकी चालवण्याचे तंत्र वापरून , महाजन यांनी डिस्क तयार केली व कॉईल मोटर मुंबईतून मागवली. दुचाकीत बदल करताना त्यांना शहरातील गणेश ऑटो गॅरेजचे मोहन मेहरे यांनी मदत केली.
चार्जिंग संपल्यावर वापरता येतो पेट्रोलचा पर्याय
एकदा चार्ज केल्यावर ही दुचाकी २२ ते २५ किमी अंतर धावते. तसेच बॅटरी लो झाल्यानंतर ही दुचाकी पेट्रोलवरदेखील चालवता येते. या दुचाकीसाठी स्वस्तातील १२ व्होल्टच्या ७ अॅम्पिअरच्या बॅटरी वापरल्या आहेत. तसेच दुचाकीत डीसी टू डीसी कन्व्हर्टर फिट केले आहे. यामुळे दुचाकी पेट्रोलवर धावत असताना त्यातील बॅटरी आपोआप चार्ज होतात. समजा लांबच्या प्रवासात दुचाकीची चार्जिंग संपल्यास पेट्रोलचा पर्याय आहे, असे महाजन यांनी सांगितले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.