आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणी:फुलगावला 660 प्रकल्पातून मिळेल पाणी ; रेल्वे रोको आंदोलन केले स्थगित

भुसावळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील फुलगाव येथील टंचाईबाबात शुक्रवारी जिल्हाधिकारी, आमदार यांच्या उपस्थितीत तहसीलमध्ये बैठक झाली. बैठकीत नवीन पाणीयोजना मंजूर होईपर्यंत महाजेनकोने पाणीपुरवठा करावा, असा निर्णय झाला. तसेच जुन्या योजेची दुरूस्ती केली जाणार आहे. नवीन योजना सुरू होईपर्यंत ६६० प्रकल्पातून पाणीपुरवठा केला जाणार असल्याने, ५ रोजी होणारे रेल्वे रोको आंदोलन स्थगित केले. तहसील कार्यालयात शुक्रवारी दुपारी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, आमदार संजय सावकारे यांच्या उपस्थितीत बैठक झाली. बैठकीला माजी पं.स. सभापती राजेंद्र चौधरी, पर्यावरण अभ्यासक के.पी. चौधरी उपस्थित होते. यावेळी आमदार संजय सावकारे यांनी संतप्त होत फुलगावच्या पाणी प्रश्नाचा प्रस्ताव २०१८ ला मंजुरीला पाठविला आहे. तरीही समस्या न सुटल्याने नाराजी व्यक्त केली. यावेळी जिल्हाधिकारी राऊत यांनी दीपनगर येथील अधिकाऱ्यांशी चर्चा केली. मुख्य अभियंता हे मुंबई गेले होते. त्यामुळे फुलगावचा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी मुंबई येथून महानिर्मितीचे व्यवस्थापकीय कार्यकारी संचालकांचा बोलवून, त्यांच्या उपस्थितीत आठवडाभरात बैठक आयोजित केली जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...