आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:तहसील कार्यालयातून डंपरची चाेरी

भुसावळ7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

खडीची वाहतूक करणारे डंपर (एमएच.१९-६३६३) पकडून महसूल विभागाने तहसील कार्यालयात जमा केले होते. हे डंपर चोरीला गेल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी डंपर मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश तहसीलदार दीपक धिवरे यांनी दिले. तहसीलच्या आवारातून डंपर चाेरी हाेण्याची तीन महिन्यातील ही दुसरी घटना आहे.

साकेगाव येथील मनाेज सुरेश भागवत हे १ नाेव्हेंबर रोजी डंपरमधून (एमएच.१९.झेड.६३६३) खडीची अवैध वाहतूक करत हाेते. महसूल विभागाच्या पथकाने हे डंपर पकडून तहसीलमध्ये जमा केले होते.

यापूर्वी आॅक्टाेबर महिन्यात पळवले होते
महसूलच्या पथकाने ८ जुलै २०२२ रोजी सुनसगाव रस्त्यावर डंपर (एमपी.३३-एच.१३२९) पकडले हाेते. गाडी मालक राज मनाेज करडे यांना दंड भरण्याची नोटीस बजावली हाेती. हे डंपर तहसीलच्या आवारात उभे केले होते. मात्र, दंड न भरताच करडे यांनी १३ आॅक्टाेबर २०२२ रोजी डंपर चाेरून नेले. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

बातम्या आणखी आहेत...