आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील बलबलकाशी व खडकारोड नाल्यात गाळ, प्लास्टिक कचरा साचला आहे. यामुळे नैसर्गिक पद्धतीने वाहणाऱ्या या नाल्याचा प्रवाह बंद झाला. नाल्यावर प्लास्टिक कचरा तरंगत असल्याने दुर्गंधी पसरली आहे. शहरातील प्रमुख मार्गांवरील मोठ्या गटारी वगळता बलबलकाशी व खडका रोड नाल्यांमध्ये कचऱ्यांचे ढीग साचले आहेत.
खडका रोडवरील नाला इतका तुंडूंब भरला आहे, की आता कचरा थेट रस्त्याच्या समतल पोहोचला आहे. सोबतच बलबलकाशी नाल्यावर खालम्मा दर्गा ते मरिमाता मंदिरादरम्यानच्या भागात नाल्यातील कचरा थेट पुलाच्या कठड्यापर्यंत पोहोचला आहे. नाल्यात प्लास्टिकच्या पिशव्या, पाण्याच्या बाटल्या तरंगत असल्याने पाण्याचा नैसर्गिक प्रवाहदेखील बंद होण्याची शक्यता आहे. पालिकेने शहरातील नाल्यांची बारमाही स्वच्छता करण्याचे धोरण राबवले होते. पण, प्रमुख मार्गांवरील गटारींव्यतिरिक्त नाल्यांची सफाई होत नसल्याची स्थिती आहे.
भूजल दूषित होणार? शहरातील अंतर्गत भागातून बलबलकाशीसह सात नाले वाहतात. या नाल्यांतील सांडपाण्याचा पूर्ण निचरा होत नाही. यामुळे सांडपाणी वाहण्याऐवजी जमिनीत मुरते. परिणामी नाल्यांच्या परिसरातील भूजल दूषित होण्याचा धोका आहे. रहिवाशांचे आरोग्य धोक्यात येण्याची भीती आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.