आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:खांब महावितरण अन् पालिकेचे, भार खासगी केबलचा; अपघाताची भीती

भुसावळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील जळगाव रोड, यावल रोडसह व इतर प्रमुख भागांतील सेंट्रल, महावितरणच्या पोलवर खासगी नेटवर्किंग आणि इंटरनेट पुरवठादार कंपन्यांच्या केबल सर्रासपणे टाकल्या जात आहेत. यामुळे अपघाताची भीती आहे. प्रामुख्याने दुरुस्तीसाठी पोलवर चढणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या जिवाला धोका होऊ शकतो. याशिवाय पालिकेचे गांधी पुतळा, जळगाव रोड, यावल रोडवर भागातील सेंट्रल पोल वाकले आहेत.

प्रमुख मार्गावर दिवाबत्तीसाठी पालिकेने सेंट्रल पोल उभारले आहेत. या सर्व पोलवरील दिव्यांना अंडरग्राउंड केबलने वीजपुरवठा दिला आहे. मात्र, काही दिवसांपासून या पोलवर खासगी केबल नेटवर्किंग, शहरात इंटरनेटची सुविधा पुरवणाऱ्या विविध खासगी कंपन्यांच्या केबलचे जाळे निर्माण झाले आहे. महावितरणच्या पोलवर तर आपली खासगी मालमत्ता समजून या कंपन्यांकडून वापर होतो. या प्रकारांमुळे काही ठिकाणी पोल वाकले आहेत. तसेच दुरुस्तीसाठी वीज खांबावर चढणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पाय केबलमध्ये अडकून अपघात होऊ शकतो.

खांबावर केबलचे वेटोळे तुटलेल्या केबलचे वेटोळे तयार करुन ते खांबांवर लटकले जाते. हे वेटोळे ट्रक किंवा अवजड वाहनात अडकल्यास ओढले जावून वीज खांब तुटू शकतो. हा प्रश्न गंभीर असला तरी पालिका , महावितरण लक्ष देण्यात तयार नाही.

बातम्या आणखी आहेत...