आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंजूर:भुसावळात मुरुमाने खड्डे बुजवणे सुरू

भुसावळ8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील खड्डेमय रस्त्यांवर पालिकेने मुरूम टाकणे सुरु केले आहे. यामुळे वाहनधारकांना तूर्त दिलासा मिळाला. शहरात वैशिष्ट्यपूर्ण कामे योजना व इतर रस्ते अनुदानातील रखडलेल्या रस्त्यांव्यतिरिक्त अन्य मंजूर नसलेल्या, पावसाळ्यानंतर कामे होणाऱ्या रस्त्यांवर मुरूम टाकणे सुरू आहे.

शहरातील प्रमुख रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. वैशिष्ट्यपूर्ण कामे योजना व १२ कोटींच्या विशेष रस्ता अनुदानातून होणाऱ्या रस्त्यांवर सीलकोट व कारपेटची कामे रखडली आहेत. या व्यतिरिक्त इतर रस्त्यांवरही खड्डे पडून चालणे मुश्किल झाले आहे. अशा मंजुरी नसलेल्या किंवा आगामी काळात होणाऱ्या रस्त्यांवर पालिकेने मुरूम टाकून दबाई सुरु केली आहे. पावसानंतर हा मुरूम वाहून निघू नये म्हणून दबाई करुन कच टाकण्यात येईल. यामुळे दिलासा मिळेल.

बातम्या आणखी आहेत...