आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रशासन:पाइपलाइनची दुरुस्ती पूर्ण; सहाव्या दिवशी शहरात पाणीपुरवठा सुरळीत

भुसावळ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या रॉ वॉटरच्या मुख्य वाहिनीला मंगळवारी (दि.३) रात्री गळती लागून पाणीपुरवठा ठप्प झाला होता. ही दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतर सहाव्या दिवशी सोमवारी दुपारी साडेबारा वाजता रॉ-वॉटरची जलवाहिनी कार्यान्वित झाली. सायंकाळी जामनेर रोड भागात रोटेशन नुसार पाणीपुरवठा करण्यात आला.

जलशुद्धीकरण केंद्रात रॉ वॉटरचा पुरवठा करणाऱ्या मेन रायझिंगला मंगळवारी (दि.३) रात्री भगदाड पडल्याने बुधवारपासून (दि.४) शहराचा पाणीपुरवठा ठप्प झाला होता. या दरम्यान शहरात ३५ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला. दुसरीकडे पालिकेने पाइप लाइनची दुरुस्ती सोमवारी (दि.९) पूर्ण केली. यानंतर दुपारी साडेबारा वाजता रॉ वॉटर पाइपलाइन सुरु झाली. दुपारी ४ वाजेपासून नाहाटा महाविद्यालया जवळील जलकुंभ भरण्यास सुरुवात झाली. नंतर रोटेशन नुसार जामनेर रोडवरील पूर्व व पश्चिमेकडील भागातील दीनदयाळनगर, गौरक्षण, सिंधी कॉलनी, बद्री प्लॉट, कन्हैयालाल प्लॉट आदी भागांना पाणीपुरवठा करण्यात आला. दरम्यान, दुरुस्ती नंतर जलशुद्धीकरण यंत्रणा साडेबारा वाजता सुरु झाली. मात्र, पाणीपुरवठ्याच्या एक्सप्रेस फीडरवर दुपारी दोन ते चार वाजेदरम्यान हा त्रास झाला. दुपारी ४.०५ वाजता वीजपुरवठा सुरळीत झाल्यानंतर रॉ वॉटर व प्युअर वॉटर यंत्रणा कार्यान्वित झाल्याची माहिती पाणीपुरवठा अभियंता सतीश देशमुख यांनी दिली.

मंगळवारी या भागात होईल पाणीपुरवठा
शहराच्या दक्षिण भागात सकाळी हुडको कॉलनी, बंब कॉलनी, प्रोफेसर कॉलनी, रामेश्वर नगर, पंचशील नगर, गंगाराम प्लॉट, चमेली नगर, श्रीराम नगर, तुळशी नगर वांजोळा रोडवरील विस्तारीत भाग, सायंकाळी उत्तर भागातील तापीनगर, राहूल नगर आदी भागात पाणीपुरवठा होईल.

बुधवारी मिळेल शहराच्या या भागांना पाणी
सकाळी दक्षिण भागातील सत्यम ट्रेडर्स परिसर, गोविंद कॉलनी, कस्तुरी नगर, सुरभी नगर, देना नगर, रानातला महादेव मंदिर भाग, चिकुचा मळा, शनी मंदिर वॉर्ड, ढाके गल्ली, सायंकाळी उत्तर भागातील गजानन महाराज नगर, शांती नगर, गोपाळ नगर, सोपान कॉलनी भागात पाणीपुरवठा होईल.

बातम्या आणखी आहेत...