आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वृक्षारोपण:बसस्थानक परिसरात लोकसहभागातून वृक्षारोपण

भुसावळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बसस्थानक परिसर स्वच्छ व हिरवागार व्हावा यासाठी पर्यावरण जागर प्रतिष्ठानने लोकसहभागातून उपक्रम हाती घेतला आहे. पहिल्या टप्प्यात स्वच्छता करुन १७ झाडे लावण्यात आली. १२ फूट उंचीच्या या झाडांना ट्री गार्ड लावले आहेत. आगामी काळात ओटे बांधून प्रवाशांसाठी बैठक व्यवस्था करण्यात येईल.

शहरातील पर्यावरण जागर प्रतिष्ठान तसेच पालिकेचे ब्रँड अॅम्बेसेडर नाना पाटील यांनी वृक्षारोपणासाठी पुढाकार घेतला. बसस्थानकात प्रवाशांना प्रसन्नता वाटावी, या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला. ब्रह्माकुमारी ज्योती दीदी व दीपाली दीदी यांच्या उपस्थितीत वृक्षलागवड झाली. आगार प्रमुख प्रमोद चौधरी, व्यवस्थापक भोई , सुनील चौधरी, अनंत झोपे व संदीप पाटील, देवदत्त मकासरे, प्रेम परदेशी, संतोष मराठे, सुरेंद्रसिंग पाटील उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...