आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समस्या मानगुटीवर:बंधाऱ्यात पाणी भरपूर; मेन रायझिंगसह हुडको भागात पाइपलाइनला गळतीने घसा सुकला

भुसावळ2 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • गळतीमुळे पावसाळ्यामध्ये जलजन्य आजारांचा धोका

शहरात पावसाळ्यातच पाइपलाइनला गळती लागण्याचे प्रमाण वाढले आहे. सध्या जलशुद्धीकरण केंद्रातून नाहाटा चौफुलीला जोडणाऱ्या मेन रायझिंगला लोखंडी पूल परिसरात गळती लागली आहे. दुसरीकडे गेल्या पंधरवड्यापासून नवीन हुडको भागातील पाइपलाइनला गळती लागल्याने शेकडो लिटर पाण्याची नासाडी होत आहे.

पालिकेच्या तापी नदीतील बंधाऱ्यात पुरेसा जलसाठा असूनही शहराला पुरेसे पाणी मिळत नाही. पालिकेकडून पाणीपुरवठ्याचे दिवस कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू असले तरी दुसरीकडे जीर्ण झालेली पाइपलाइन वारंवार फुटल्याने पाण्याची नासाडी होते. शहरातील मुख्य जलशुद्धीकरण केंद्रातून नाहाटा चौफुलीला जोडणाऱ्या जलकुंभांवरील पाइपलाइन लोखंडी पुलाजवळ फुटली आहे. तर दुसरीकडे सतारे पूल परिसरात हीच स्थिती आहे. नवीन हुडको भागात मुख्य रस्त्यावर तीन ठिकाणी पाइपलाइनला गळती लागल्याने पाण्याची नासाडी होते.

बातम्या आणखी आहेत...