आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:प्लॉट विक्रीप्रकरण; तीन तलाठ्यांचे जबाब घेतले

भुसावळ14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील जनकल्याण अर्बन पतसंस्थेचे प्लॉट विशेष वसुली अधिकारी रवींद्र धांडे यांनी परस्पर विक्री केल्याचा गुन्हा दाखल आहे. या प्रकरणी अटकेतील नायब तहसीलदार शशिकांत इंगळे व शाम तिवारी यांची पोलिस कोठडी शनिवारी संपणार आहे. यामुळे त्यांना न्यायालयात हजर करण्यात येईल. याप्रकरणी तालुक्यातील १७ तलाठ्यांची जबाब नोंदणी पोलिसांनी सुरू केली आहे.

धांडे याने तहसीलदारांचा बनावट आदेश वापरून जनकल्याण अर्बन संस्थेचे दहा प्लॉट परस्पर विक्री केले. याप्रकरणी धांडे व प्लॉट घेणाऱ्या दहा जणांविरुद्ध भुसावळ शहर पााेलिस ठाण्यात १७ जुलै रोजी गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी तपास अधिकारी तथा उपनिरीक्षक अंबादास पाथरवट यांनी आता तलाठ्यांचे जबाब घेणे सुरू केले आहे. या गुन्ह्याशी निगडीत काही प्रकरणे तुमच्याकडे आली होती का? इतर काही माहिती आहे का? ही चौकशी सुरू केली आहे. त्यासाठी शुक्रवारी तीन तलाठ्यांना पोलिस ठाण्यात बोलावले होते. एकूण १७ तलाठ्यांचे जबाब नाेंदवले जाणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...