आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:1 लाख रुपये हिसकावून सावद्यात दोघांचा पोबारा; याप्रकरणी दोन अज्ञान चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल झाला

सावदा17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील पंजाब नॅशनल बँकेच्या शाखेसमोरून एका शेतकऱ्याची एक लाख रुपयांची रक्कम दोन भामट्यांनी लांबवली. नंतर ते दुचाकीवरून पसार झाले. ही घटना सोमवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास घडली. दोन्ही भामटे ज्या मार्गाने गेले, तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले असता त्यांची छबी चित्रित झाली.

गौरखेडा (ता.रावेर) येथील शेतकरी रमेश यादव महाजन हे सावदा शहरातील पंजाब नॅशनल बँकेसमोर उभे होते. त्यांच्या हातात असलेल्या पिशवीत ५०० रूपयांच्या २०० नोटा अशी एक लाखाची रक्कम व काही महत्त्वाची कागदपत्रे होती. यावेळी दुचाकीवर आलेल्या दोन भामट्यांनी महाजन यांना तुमच्या मागे पैसे पडले आहे, असे सांगितले. यामुळे महाजन यांचे लक्ष विचलित होताच दोघांनी त्यांच्या हातातील पैसे असलेली पिशवी हिसकावून पोबारा केला.

याप्रकरणी दोन अज्ञान चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल झाला. घटनेची माहिती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक डी.डी.इंगोले, उपनिरीक्षक समाधान गायकवाड यांनी तपास सुरू केला. दोन्ही भामटे ज्या मार्गाने गेले होते, तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यात आले. त्यात दोन्ही चोरट्यांची छबी कैद झाली आहे. त्यानुसार अन्वर तडवी तपास करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...