आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकस्मात मृत्यू:विष प्राशन केलेल्या प्रौढाचा उपचारादरम्यान मृत्यू ; जळगाव पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद

यावल12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील कोरपावली येथील ३८ वर्षीय प्रौढाने वडील कर्जबाजारी झाल्याच्या तणावातून आत्महत्येचा प्रयत्न केला. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. संजय उर्फ बाळू रमेश महाले या विवाहित प्रौढाने १२ जूनला विषारी द्रव प्राषन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. हा प्रकार निर्दशनास येताच त्याला यावल ग्रामीण रूग्णालयातून जळगावला हलवण्यात आले होते. उपचारादरम्यान १६ जूनला रात्री त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी जळगाव पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद झाली. ही नोंद यावल पोलिसांकडे वर्ग करण्यात आली आहे. मृताच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार असून या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.

बातम्या आणखी आहेत...