आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोहीम:पालिकेच्या कामात हस्तक्षेप‎ केल्यास होणार पोलिस कारवाई‎

शहादा‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील नागरिकांकडे मालमत्ता कर घरपट्टी‎ व पाणीपट्टी कराची रक्कम गेल्या दोन वर्षा‎ सुमारे दहा कोटी रुपयांपर्यंत थकित असल्याने ‎ ‎ पालिका प्रशासनातर्फे वसुली मोहीम‎ राबवण्यात येत आहे. शहरातील गरीब नवाज ‎ ‎ कॉलनीमध्ये पालिकेचे वसुली पथक थकित ‎ ‎ कराची वसुली करण्यासाठी गेले असता ‎ ‎ थकबाकीदार नागरिकांनी त्यांना शिवीगाळ‎ करत मारहाण करण्याची घटना घडल्याने‎ पोलिस कारवाई करण्याचा इशारा नगरपालिका‎ प्रशासनाने दिला आहे.‎ शहरातील गरीब नवाज कॉलनी वसुली‎ विभागातील क्लार्क खलील शेख मुशिर व‎ त्याचे सहकारी संजय जयवंत माळी विलास‎ ठाकरे यांचे पथक लईक शेख शकूर व वसीम‎ बागवान यांच्याकडे थकबाकी वसुलीसाठी‎ गेले असता बागवान व त्याच्या दोन-तीन‎ सहकाऱ्यांनी शिवीगाळ करत मारहाण केली.‎

पथकाने मुख्याधिकारी दिनेश येणारे यांना‎ याबाबत माहिती दिली. घटनेची माहिती‎ मिळाल्यानंतर मुख्याधिकाऱ्यांनी वसुली‎ विभागातील सर्व कर्मचाऱ्यांची तातडीची‎ बैठक घेत गरीब नवाज कॉलनी परिसरात‎ घडलेल्या प्रकाराबाबत कर निरीक्षक राजेंद्र‎ सैंदाणे यांना वसुली पथकातील कर्मचाऱ्यांसह‎ पोलीस स्टेशन येथे जाऊन पथकावर हल्ला‎ करणाऱ्या नागरिकांविरोधात तक्रार देण्याचे‎ आदेश दिले. यानंतर पुन्हा या प्रकाराची‎ पुनरावृत्ती होऊ नये यासाठी विशेष खबरदारी‎ बाळगण्याचे सूचना मुख्याधिकाऱ्यांनी‎ कर्मचाऱ्यांना केल्या आहेत.‎

बातम्या आणखी आहेत...