आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विरोध:मुक्ताईनगरातील सभा रोखण्यासाठी राजकीय दबावतंत्राचा होतोय वापर

मुक्ताईनगर25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेनेच्या ठाकरे गटातर्फे ४ नोव्हेंबरला मुक्ताईनगरात महाप्रबोधन सभेचे आयोजन केले आहे. सायंकाळी ५ वाजता जेडीसीसी बँकेजवळ ही सभा होईल. मात्र, राजकीय दबावातून सभेत मुद्दाम अडथळे आणले जात आहेत. सभेच्या प्रचारासाठी रिक्षावर ध्वनिक्षेपक लावले असता काही ठिकाणी विरोध करून रिक्षा चालकास धमक्या देण्यात आल्या असा आरोप युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख पवन सोनवणे, प्रसिद्धी प्रमुख सुमेरसिंग राजपूत केला.

शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे, लोकसभा संपर्क प्रमुख विलास पारकर आदीं पदाधिकारी महाप्रबोधन यात्रेनिमित्त जिल्हाभरात सभा घेत आहे. ४ नोव्हेंबरला मुक्ताईगरात त्यांची सभा नियोजित आहे. मात्र, सभेपूर्वी राजकीय आरोपांचा धुराळा उठण्यास सुरुवात झाली आहे. युवा सेना पदाधिकाऱ्यांनी पोलिस प्रशासन राजकीय दबावातून मुद्दाम विरोधात भूमिका घेत आहे. नियोजित जागेसाठी २८ रोजी पालिकेत अर्ज दिला. मात्र, राजकीय हस्तक्षेपामुळे आम्हाला सभेसाठी जागा देण्यात अडथले आणले. शिंदे गटातील लोकप्रतिनिधी राजकीय दबावतंत्राचा वापर करत असल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांनी केला.

बातम्या आणखी आहेत...