आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थंडीचा जोर वाढला:प्रदूषण घटले; 108 पर्यंत वाढलेला एक्यूआय 90 पर्यंत खाली

भुसावळ12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिवाळीत फटाक्यांच्या आतषबाजीमुळे शहरातील प्रदूषणाचा निर्देशांक वाढला होता. दिवाळीच्या दिवशी व नंतरही हा एअर इंडेक्स म्हणजेच एक्यूआय १०८ पर्यंत पोहोचला होता. १ नोव्हेंबरनंतर त्यात सुधारणा होऊनही तो १०० पेक्षा कमी नव्हता. पण, गेल्या दोन दिवसांपासून हा एक्यूआय ९०पर्यंत खाली आला. हवेचे प्रदूषण कमी होऊन शहरात गुलाबी थंडीचा जोरही वाढला आहे.

शहरात दिवाळी दरम्यान फटक्यांच्या आतषबाजीने धुराची चादर निर्माण झाली होती. यामुळे हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक म्हणजेच एक्यूआय १०८ पर्यंत वाढला होता. हवामानाचा अंदाज व हवेच्या गुणवत्तेचा वेध घेणाऱ्या अॅक्युवेदरने ही नोंद केली होती. दिवाळीनंतर हवेच्या गुणवत्तेत हळूहळू सुधारणा झाली. गेल्या दोन दिवसांपासून हा निर्देशांक ९० एक्यूआरवर आला. दरम्यान, सध्या उत्तरेकडील शीतलहरींमुळे शहराचे तापमान घसरले आहे. शनिवारचे किमान तापमान १४ अंश होते. त्यात घट होण्याची चिन्हे आहेत.

बातम्या आणखी आहेत...