आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील योगा मास्टर पूनम कुलकर्णी यांनी कोरोनाच्या काळापासून स्वत: योगाभ्यास करुन तब्बल ३२५ महिलांना योगाचे मोफत प्रशिक्षण दिले. ऑनलाइन क्लासेसच्या माध्यमातून कॅनडा, ओमान व अबुधाबीसह देशातील मोठ्या शहरातील विद्यार्थ्यांना त्या योगाभ्यासाचे धडे देत आहेत.
पूनम कुलकर्णी एमएस्सी होऊन नेट-सेट, पीएचडीची तयारी करत होत्या. स्वत:च्या आरोग्यासाठी त्या गेल्या नऊ वर्षांपासून योगाही करत होत्या. यापूर्वी आयुष मंत्रालयाचे योगा प्रशिक्षण दीड महिना या काळासाठी निवासी असल्याने त्या प्रशिक्षण घेवू शकल्या नाहीत. मात्र, कोरोना काळात हे प्रशिक्षण ऑनलाइन झाल्याने त्यांनी प्रवेश घेतला. आयुष मंत्रालयाची एक ते सहा पर्यंतच्यासर्व लेव्हलचे ऑनलाइन प्रशिक्षण घेवून त्यांनी याच काळात ३२५ महिलांना मोफत प्रशिक्षण दिले. आता त्या ऑनलाइन वर्गातून कॅनडा, ओमान, अबुधाबी येथील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देत आहेत.
अंत्यत कठीण योगा मास्टर मध्ये यश
केंद्रीय आयुष मंत्रालयाची सर्वोच्च योगा मास्टर ही अत्यंत कठीण समजली जाणारी परीक्षा कुलकर्णी यांनी ७७.५० टक्क्यांसह उत्तीर्ण केली. दहा वर्षांत देशभरातील केवळ ९८ जणांनी या परीक्षेत यश मिळवले आहे. त्यात पूनम कुलकर्णींचा समावेश आहे. ही परीक्षा उत्तीर्ण झालेल्या त्या जिल्ह्यातील एकमेव आहेत.
शहरातील शांती नगर भागातील सानवी सुप्रित मुळे ही अवघ्या पाच वर्षांची पहिलीतील चिमुरडी योगाभ्यास तरबेज आहे. आजोबा मध्य प्रदेश वीजनिर्मिती कंपनीचे सेवानिवृत्त अभियंता अविनाश मुळेंच्या तालमीत ती दोन वर्षांपासून पाण्यावर शवासन करत आहे. नियमित सरावामुळे ती पाण्यावर सलग अर्धा तास शवासन करते. संपूर्ण शरीराला आराम देणाऱ्या शवासनाला योगाभ्यासात महत्त्व आहे. उत्कृष्ट पोहता येत असले तरी पाण्यावर शवासन करणाऱ्यांची संख्या अत्यल्प आहे. मेंदू व श्वासावर नियंत्रण ठेवूनच पाण्यावर शवासनाची क्रीडा करता येते. अविनाश मुळे यांनी नात सानवी हिला ती साडेतीन वर्षांची असल्यापासूनच शवासनाचे प्रशिक्षण देणे सुरु केले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.