आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्राहक:सूचना न देता साडेचार तास वीज खंडित ; उकाडा झाला असह्य

भुसावळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पावसाळ्यापूर्वी वाढलेल्या झाडाच्या फांद्या तोडण्यासाठी वीज कंपनीतर्फे, गुरूवारी सकाळी ८ ते दुपारी १२.३० या वेळेत कोर्ट फिडरवरील वीजपुरवठा बंद करण्यात आला होता. या वेळेत वीज कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी या भागातील झाडांच्या वाढलेल्या फांद्या तोडल्या. वीज पुरवठा बंद केल्यानंतर महात्मा गांधी पुतळा परिसरातील झाडांच्या फांद्या तोडल्या गेल्या. तसेच महिला कॉलेज, मामाजी टॉकीज परिसर, महात्मा फुलेनगर परिसर, कोर्ट परिसर आदी भागातील वीजपुरवठा या वेळेत खंडीत होता. यामुळे या भागातील पेट्रोल पंपचालकांना जनरेटरवर सुरू करावे लागले. दुपारी उकाडा असह्य होत असताना, वीज कंपनीकडून अचानक वीजपुरवठा खंडीत करण्यात आल्याने, ग्राहकांमधून नाराजी व्यक्त केली जात होती. ज्या भागातील वीज पुरवठा बंद राहणार आहे, त्या भागात दोन दिवस आधी दवंडी देऊन नागरिकांना माहिती द्यावी, अशी मागणी करण्यात आली. पावसाळ्याच्या तोंडावर वीज कंपनीतर्फे उपाययोजना केल्या जात आहेत. त्याची ग्राहकांना पूर्वसूचना देणे अपेक्षित आहे.

बातम्या आणखी आहेत...